आई, दादा आणि गजानन महाराज अनुभव
Gajanan Maharaj anubhav
7/29/20261 min read

समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय ।।
नर्मदे हर ।।
मी कविता सराफ, नेपरव्हिल हुन गजानन महाराजांचा अनुभव कथन करण्याचा प्रयत्न करणार आहे.
महाराज आपल्या भक्तांचे मनोरथ कसे पुरवतात ह्याची प्रचिती कशी अली मला त्याबद्दल मी सांगणार आहे.
साधारण वर्षभरापूर्वी मी नर्मदापुत्र श्री उदयन आचार्य ह्यांची audio clip ऐकली होती त्यात त्यांनी नर्मदा मैय्या सर्व जड-जीवांची कशी काळजी घेते आणि सद्गती प्राप्त होण्यासाठी मदत करते अशा अर्थाची ती क्लिप होती. नर्मदाष्टकातला ७ व्या श्लोकात 'ततस्तु जीवजंतूंतंतू भुक्तिमुक्ति दायकं' असा उल्लेख आहे त्याबद्दल त्यांनी सांगितलं होत. त्यादिवसापासून मीही त्या क्लिप चा विचार करत होते. माझे आई-वडील मी त्यांना आई-दादा म्हणायचे .... आता नाहीत......दादा माझ्या लग्नाआधी २००१ साली अकस्मात गेले आणि आई सनाच्या जन्मानंतर १ वर्षांनी २००९ साली गेली. मला नेहेमी मी आईदादांसाठी काहीच करू शकले नाही अशी खंत वाटते ....... हि ऑडिओ क्लिप ऐकून मला वाटलं आपल्याला पण नर्मदा परिक्रमा आई-दादांसाठी करता आली तर किती बर होईल? मृत्यनंतर त्यांना सुस्थिती प्राप्त झाली आहे कि नाही किंवा ती होण्यासाठी मी आता काही करू शकते का ? कारण बाकी काही करण...आता माझ्या हातात नाहीये. पण तेव्हा lockdown announce झालं होतं आणि तसही इथे राहत असल्यामुळे ते सहज शक्य नाही हे तेव्हाच लक्षात आलं ....म्हणून मग मी थोडातरी समाधान मिळावं म्हणून नर्मदाष्टक पाठ केल आणि ते बऱ्याचदा म्हणते .....तरीही मनाची घालमेल काही थांबली नाही.... खूप अस्वस्थ वाटत राहिलं .... त्यानंतर मे २०२१ मध्ये अवधूत दातेनी मला विचारलं की अस्मिता ताई सेन chicago गजानन परिवारासाठी वेळ देणार आहेत आणि त्यांचे अनुभव सांगणार आहेत ...तर तू त्यासाठी प्रश्न विचारशील का ? आणि त्याने सांगितलं कि १९ जून ला कार्यक्रम असणार आहे ...... मी तारीख ऐकून लगेच हो म्हटलं ....मला वाटलं माझी अस्वस्थता महाराजांना आणि नर्मदा मातेला पण कळली असावी .... कारण आई दादांचा लग्नाचा वाढदिवस १९ जून ला असायचा .... माझी आई गजानन महाराज भक्त आणि दादा शिवभक्त ....शिवरात्रीला आमच्याकडे अखंड शिवलिलामृताचं वाचन करायचे आई -दादा आणि त्यांच्या लग्नाच्या वाढदिवशी मला अस्मिता ताईंशी आपल्या परिवारातर्फे संवाद साधण्याची संधी मिळणार म्हणून खूप आनंद झाला.... १९ जून ला हा कार्यक्रम काही तांत्रिक अडचणीमुळे उशिरा सुरु झाला पण तरीही हा कार्यक्रम महाराज आणि नर्मदा मातेच्या कृपेमुळे छान होणार अशी खात्री होती .....त्यादिवशी ह्या कार्यक्रमानंतर माझ्या बहिणींचा फोन आला आणि त्या म्हणाल्या की आज किती छान संधी तुला मिळाली ताईंशी बोलण्याची ....खूप समाधान वाटलं ..... ह्यासाठी अवधूत दाते आणि अस्मिता ताईंचे खूप खूप आभार. अवधूतला हे माहित नव्हते...पण माझा असा विश्वास आहे कि महारांजांचीच कृपा आहे आणि त्यांनी अवधूततर्फे माझी ईच्छा जाणली आणि पूर्ण केली
त्याच दिवशीअस्मिता ताईंचे अनुभव सांगताना त्या म्हणाल्या की तुम्ही नुसत महाराजांकडे बोट द्या तुम्हाला ते हात धरून पुढे घेऊन जातील ..... आणि मला वाटलं कि CKB काली बारी देवळात महाराज आणि नर्मदेतील शिवलिंग असा दोन्ही आहे तर ckb पायी वारी केली तरी ती नर्मदा परिक्रमा करण्यासारखीच आहे आणि ती आई-दादांसाठी नक्की करता येईल. त्या दिवशी ठरवलं कि पुढच्या शनिवारी जून २६ ला पायी वारी करायची..... आणि २६ जून ला मी आणि राहुलने सकाळी ५:३० ला संकल्प केला आणि आई-दादा आणि महाराजांनी नमस्कार करून आम्ही घराबाहेर पडलो. आम्ही चौघांनी, रवी आणि प्रेषिता पहिली पायी वारी पूर्ण केली. आमच्यासह चालणाऱ्या रवी आणि प्रेषिता चे पण खूप आभार कारण त्या दिवशी खूप पाऊस पडत होता पण आमच्यापैकी एकाच्याही मनात आपण हे आजच का करत आहोत असा विचार आला नाही आणि खूप चांगल्याप्रकारे आम्ही वारी पूर्ण करू शकलो.
त्या दिवशी पण असच खूप समाधान मिळालं आणि खूप दिवसांनी चांगली झोप लागली....
आई-दादांच्या च्या स्मृती प्रित्यर्थ अस्मिताताईंना परिक्रमेसाठी छोटोशी भेट देता आली ह्यासाठी सुद्धा अवधूत चे खूप आभार.
महाराज कशा आपल्या छोट्या छोट्या ईच्छा पुरवतात आणि आपल्याकडे किती लक्ष आहे महाराजांचे हे बघून खूप बरं वाटतं
संपूर्ण गजानन महाराज परिवाराची मी कायमची ऋणी आहे की महाराजांमुळे इथेहि मला खूप चांगली माणसे भेटली. आपल्याकडून महाराजांची खूप सेवा घडो आणि कधी तरी नर्मदा परिक्रमेची संधी मिळो हीच महाराज चरणी प्रार्थना.
जय गजानन ||
नर्मदे हर ||
July 2021
Kavita's Kaleidoscope
Reflective essays, quiet prose, and cultural commentary.
Home-Essays-About-Contact
Correspond
hello@kavitaskaleidoscope.com
New pieces published twice monthly
© 2026 Kavita's Kaleidoscope-Written and curated by Kavita.
Quiet Prose & Observations